हिंदु जनजागृती समितीचे ‘हलाल’ सक्तीविरोधी आंदोलन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्‍या काही काळापासून भारतात हेतूतः ‘हलाल उत्‍पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्‍यापार्‍यांना व्‍यवसाय करण्‍यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्‍यावे लागत आहे. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्‍पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि मुस्‍लिम देशांच्‍या निर्यातीसाठी मर्यादित होती. आता मात्र भारतातील साखर, तेल, आटा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्‍पादनेही ‘हलाल सर्टिफाइड’ होऊ लागली आहेत. मुळात भारत सरकारच्‍या अधिकृत ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्‍था उत्‍पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्‍या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची गरजच काय ?

आज मॅकडोनल्‍ड्‌स, केएफ्‌सी, बर्गरकिंग, पिझ्‍झा हट यांसारख्‍या नामवंत कंपन्‍या हिंदू, जैन, शीख अशा गैर-मुस्‍लिम समाजाला सर्रास ‘हलाल’ खाद्यपदार्थ विकत आहेत. भारतातील १५ टक्‍के मुसलमान समाजासाठी ८० टक्‍के हिंदु समाजावर हलाल उत्‍पादनांची सक्‍ती आम्‍ही खपवून घेणार नाही. यंदाची दिवाळी हलाल उत्पादनांना विरोध करून ‘हलाल’ मुक्त दिवाळी साजरी करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी दिली. ते स्टेडियम कॉम्प्लेक्स चौकात आयोजित हलाल सक्तीविरोधी आंदोलनप्रसंगी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, या अघोषित हलाल सक्‍तीच्‍या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आज संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. हल्‍दीराम, हिमालया, नेस्‍ले यांसारख्‍या अनेक कंपन्‍या त्‍यांचे शाकाहारी पदार्थ देखील ‘हलाल सर्टिफाइड’ करून विकत आहेत. हलालची ही सक्‍ती का, भारतातील हिंदूंना खाण्‍याचे किंवा खरेदीचे संवैधानिक स्‍वातंत्र्य का नाही ? त्‍यामुळे हिंदु समाजाने ‘हलाल प्रमाणित’ उत्‍पादने न घेता यंदाची मंगलमय दिवाळी ही हिंदु पद्धतीने ‘हलाल मुक्‍त दिवाळी’ साजरी करावी, तसेच जसा चिनी उत्‍पादनांवर बहिष्‍कार टाकला, तसाच या हलाल अर्थव्‍यवस्‍थेला विरोध करा.

या वेळी हिंदू महासभा, हिंदू राष्ट्र सेना, मानव अन्याय निवारण समिती, सनातन संस्था या संघटनाचे प्रतिनिधी तसेच राष्ट्र अन धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते. समितीचे निखिल कदम,  सायली पाटील, सनातनच्या क्षिप्रा जुवेकर यांनी संबोधित केले. ‘नही चलेगी, नही चलेगी, हलाल की सक्ती नही चलेगी’ अशा घोषणा देण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.