पारोळा येथे पावसाची जोरदार हजेरी… बोरी धरणाचे चार दरवाजे उघडले

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

पारोळा येथे सायंकाळी ५ च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने, काहीसे उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की मागील काही दिवसांपासून तुरळक प्रमाणात पाऊस पडत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते परंतु आज सायंकाळी ५ वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक ते दीड तास जोरदार पाऊस पडला. अचानक झालेल्या दमदार पावसामुळे बाजारातील विक्रेत्यांची मात्र चांगलीच दमछाक उडाली.

मात्र पावसाच्या पाण्यामुळे शहरातील लवण गल्लीत पुर सदृर्श परिस्थिती निर्माण झाली होती. शहरासह आजुबाजुच्या ग्रामीण भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

बोरी धरणाचे चार दरवाजे उघडले

बोरी नदीच्या उगम स्थानी तसेच मध्ये हि जोरदार पाऊस झाल्याने बोरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत.

बोरी मध्यम प्रकल्प, तामसवाडी, ता.पारोळा जि. जळगाव

बोरी धरणाची पाणी पातळी २६७.१० मी.

उपयुक्त साठा टक्केवारी = १००%

संध्याकाळी ६ वा. धरणाचे ४ दरवाजे ०.३०मी ने उघडून ३६१२ क्युसेस विसर्ग नदी पात्रात सुरु आहे. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नदीपात्रात न जाण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.