आरोग्यदायी सब्जा

0

लोकशाही, विशेष लेख

 

बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांचे आहारामध्ये सब्जाचे(Sabja) सेवन करण्याचं प्रमाण वाढू लागलंय. सब्जाच्या बिया आपल्या शरीरासाठी (Health Care Tips) लाभदायक असतात आणि योग्य प्रमाणात सब्जा खाल्ल्यास आरोग्य निरोगी राहण्यासही मदत मिळते. सब्जामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, मॅगनिज, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस हे घटक भरपूर प्रमाणात असतात. आपल्या डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सब्जाच्या बियांचा समावेश केला जाऊ शकतो.

सब्जामध्ये अँटी- ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, हे घटक आपल्या आरोग्यासाठी पोषक आहेत. आपल्या पचन प्रक्रियेसाठी सब्जा अतिशय लाभदायक आहे. सब्जामध्ये फायबरची मात्रा भरपूर असते, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. आपण दिवसभरात कधीही सब्जाचे पाणी पिऊ शकता. यामुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते. फिट राहण्यासाठी शरीराच्या पचन संस्थेचं कार्य योग्य पद्धतीने होणं आवश्यक असते. सब्जामध्ये अधिक प्रमाणात फायबर (Soluble fiber) असते. पाण्यामध्ये सब्जा मिक्स केल्यास या बिया अधिकाधिक पाणी शोषून घेतात. सब्जायुक्त पाणी प्यायल्यास आपल्याला वारंवार भूक लागत नाही. यामुळे आपल्या शरीरात अन्नाद्वारे अतिरिक्त कॅलरीज् जात नाही. ज्यामुळे शरीर फिट राहण्यास मदत मिळते.

सब्जाच्या बियांमध्ये १४ टक्के प्रोटीनचा समावेश असतो. याव्यतिरिक्त बियांमध्ये अमिनो अ‍ॅसिड देखील असते. स्नायूंचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी शरीराला प्रोटीनचा पुरवठा होणे आवश्यक असते. प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थांच्या सेवनामुळेही वारंवार भूक लागण्याची समस्या दूर होते.हृदयाचं आरोग्य निरोगी राहणं अतिशय आवश्यक आहे. सब्जामध्ये ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड, अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणात असतात. या घटकांमुळे आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

संकलन –संयोजन
सुबोध रणशेवरे
संपर्क -९८३३१४६३५६
इमेल –http://subodh.ranshevre @rediffmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.