मासिक पाळीबद्दलचे हे गैरसमज दूर करून मुलींचे शालेय शिक्षण चालू ठेवण्याचे व्हिस्परचे उद्दिष्ट

0

लोकशाही विशेष लेख

 

भारतात दर 5 पैकी 1 मुलगी, मासिक पाळीबद्दल (Menstrual cycle) पुरेसे शिक्षण नसल्यामुळे, शाळा सोडते असे अभ्यासांतून दिसून आले आहे. दर 10 पैकी 7 मातांना मासिक पाळीमागील जीवशास्त्र माहीत नसते आणि त्या मासिक पाळीला ‘घाणेरडी व अशुद्ध’ समजतात, असेही अभ्यासांतून पुढे आले आहे. हा गैरसमज त्यांच्या मुलींमध्येही निर्माण होतो. आई मुलांची पहिली शिक्षिका असल्यामुळे त्यांनी वयात येणाऱ्या मुलींना मासिक पाळीच्या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल व योग्य उत्पादनांच्या वापराबद्दल योग्य ते शिक्षण देणे खूपच महत्त्वाचे आहे. मातांना शिक्षण देण्यासाठी आणि अज्ञान व चुकीच्या माहितीचे चक्र भेदण्यासाठी, प्रॉक्टर अँड गॅम्बल समूहातील (Procter & Gamble Group) फेमिनाइन-केअर ब्रॅण्ड व्हिस्परने (Feminine-care brand Whisper) आपल्या #KeepGirlsInSchool अभियानाचे चौथे पर्व सुरू केले आहे.

लिओ बर्नेट (Leo Burnett), व्हिस्पर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली द मिसिंग चॅप्टर अशा शीर्षकाची नवीन फिल्म मातांपर्यंत पोहोचून त्यांना मासिक पाळीच्या जीवशास्त्राविषयी शिक्षण देत आहे. जेणेकरून, त्या पुढे मासिक पाळीविषयक वैयक्तिक स्वच्छतेचे शिक्षण त्यांच्या मुलींना देऊ शकतील तसेच मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड्सचा (Sanitary pads) वापर कसा करायचा याबद्दल मार्गदर्शनही करू शकतील. भारताच्या अनेक भागांमध्ये माता स्वत:च आपल्या मासिक पाळीदरम्यानच्या शरीराच्या जीवशास्त्राबद्दल अनभिज्ञ असल्यामुळे भारतातील 71 टक्के मुलींना प्रत्यक्ष मासिकपाळी येईपर्यंत त्याबद्दल काहीच माहिती नसते. परिणामी या तरुण मुलींना मासिक पाळी कशी हाताळावी याबद्दल मर्यादित ज्ञान असते आणि त्या दर महिन्याला ह्या दिवसांमध्येच घरीच राहणे पसंत करतात.

व्हिस्परने आपले #KeepGirlsInSchool अभियान प्रथम 2020 साली राबवले आणि त्या माध्यमातून दर महिन्याला भारतातील शाळांमध्ये ‘मिसिंग गर्ल्स’ अर्थात ‘गैरहजर राहणाऱ्या मुलींवर’ प्रकाश टाकला. हे विचारप्रवर्तक अभियान व्हिस्परने 2021 मध्येही कायम राखले आणि मासिकपाळीच्या काळात ‘मिसिंग फ्युचर’ अर्थात भवितव्याचे नुकसान या मुद्दयावर प्रकाश टाकण्यात आला. मासिक पाळीच्या काळात शाळा बुडवणाऱ्या मुली हाच ह्या अभियानाचा विषय होता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गेल्या 30 वर्षांपासून, व्हिस्पर आपला शाळा व समुदाय कार्यक्रम राबवत आहे. ह्याद्वारे 10 कोटींहून अधिक कन्या व मातांना मोफत सॅनिटरी पॅड्स व मासिक पाळीविषयक शिक्षण देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.