मेट्रोपोलिस हेल्थकेयरतर्फे  २५० वैद्यकीय विद्यार्थ्यांना मेडएन्गेज उपक्रमात शिष्यवृत्ती प्रदान  

0

लोकशाही, विशेष लेख

 

मेट्रोपोलिस फाउंडेशन (Metropolis Foundation), मेट्रोपोलिस हेल्थकेअरची सीएसआर शाखेतर्फे आज मेडएन्गेज स्कॉलरशिप समिट २०२३ (MedEngage Scholarship Summit) च्या ५ व्या  शिष्यवृत्ती  प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मेडएन्गेज शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत २५० वैद्यकीय विद्यार्थ्यांना (अंतिम वर्ष एमबीबीएस आणि एमडी/डीएनबी) एकूण १.७ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती अनुदान प्रदान करण्यात आली.  शैक्षणिक स्कोअर, अभ्यासक्रमेतर क्रियाकलाप आणि शोधनिबंध/प्रबंध सादरीकरणासाठी हे शिष्यवृत्ती साठी मानक होते. मेट्रोपोलिसचे अध्यक्ष डॉ. सुशील शहा (Dr. Sushil Shah) यांच्या संकल्पनेतून, मेडएन्गेज हा एक समग्र वैद्यकीय कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश भारतातील तरुण वैद्यकीय प्रतिभेला प्रोत्साहन देणे आहे कारण हेच तरुण भारतातील आरोग्यसेवेच्या कौशल्याचे भविष्य घडवीत आहेत.

हा कार्यक्रम पात्र आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक अनुदान देऊन आणि मेट्रोपोलिसच्या जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा आणि बोर्डावरील तज्ञांच्या पॅनेलद्वारे त्यांना व्यावहारिक ज्ञान देऊन देशातील आरोग्यसेवा संशोधनात योगदान देण्यासाठी मदत करतो. मेडएन्गेज शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या या वर्षीच्या आवृत्तीला भारतातील २९ राज्यांमधील ५१६ शहरांमधून २६७० हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या कार्यक्रमात देशातील सरकारी आणि खासगी अशा ५०० हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश होता. सहभागींना त्यांची शैक्षणिक कामगिरी आणि इतर अनेक मूल्यमापन मापदंडांवर आधारित कठोर निवड प्रक्रियेतून जावे लागले. अर्न्स्ट अँड यंग एलएलपीची (Ernst & Young LLP) या शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी प्रक्रिया सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मेडएन्गेज शिष्यवृत्ती कार्यक्रमावर भाष्य करताना मेट्रोपोलिस फाउंडेशनच्या चेअरपर्सन डॉ. दुरू शहा (Dr. Duru Shah) म्हणाल्या “वर्षानुवर्षे या शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी तरुण वैद्यकीय डॉक्टरांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. देशाच्या तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे. मेडएन्गेज कार्यक्रमाद्वारे, मेट्रोपोलिस फाउंडेशनला देशातील शैक्षणिक परिदृश्य सुधारण्याची आणि आमच्या विद्यार्थ्यांना “सक्षम आणि प्रोत्साहन” देण्याची आशा आहे. आमचे भविष्यातील हेल्थकेअर वॉरियर्स हेल्थकेअर इकोसिस्टम मध्ये योगदान देतील.”

Leave A Reply

Your email address will not be published.