Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये
    • सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात
    • पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण
    • पाकिस्तानमधील बन्नू येथे भीषण प्राणघातक हल्ला
    • होर्मुज खाडीत भारतीय जहाजाला टार्गेट करून हल्ला!
    • ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा उडाली खळबळ
    • मुख्यमंत्री होताच थलपती विजयने घेतले तीन मोठे निर्णय
    • पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शाळकरी मुलाचा शाळेची भिंत अंगावर कोसळून मृत्यू
    गुन्हे वार्ता

    शाळकरी मुलाचा शाळेची भिंत अंगावर कोसळून मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 1, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नशिराबाद , लोकशाही न्यूज नेटवर्क

    येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत अंगावर कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहित योगेश नारखेडे (वय-१३ रा. – वरची आळी नशिराबाद, तालुका- जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे.

    नशिराबाद गावातील वरची आळी भागात मोहित हा त्याच्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. मोहित हा सातवीच्या वर्गात शिकत होता. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मोहित मित्रांसोबत घरापासून पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या सनसवाडी रोडवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ खेळत होता. खेळता खेळता भिंतीला धक्का लागला.

    अचानक शाळेची संरक्षक भिंत त्याच्या अंगावर कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालविली. मुलाच्या मृत्यू झाल्याचे पाहून त्याच्या आई-वडिलांनी जिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला. धक्कादायक म्हणजे गेल्या सात महिन्यापूर्वी या शाळेच्या संरक्षक भिंतींचे काम करण्यात आले आहे. दरम्यान, ठेकेदाराने भिंतीचे काम चांगल्या दर्जाचे न केल्यामुळे ती अचाकन कोसळली. यामुळे निष्पाप मुलाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मयत मोहितचे वडील योगेश अशोक नारखेडे यांनी केला आहे .

    #amalner #bhadgaon #bhusawal #chalisgaon #crime #dhule #erandol #khandesh #murder #pachora #police #theft accident Bodwad Burglary Chain Snickers Hajpur jalgaon Jamner Nandurbar Parola Raver Sawda Yaval
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये

    May 10, 2026

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif