ड्रग्जसाठी पैसे न दिल्याने आईच्या शरीराचे दोन तुकडे करून केली हत्या

0

चंदिगढ ;- ड्रग्जसाठी पैसे न दिल्याने एका मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची हादरवणारी घटना पंजाब राज्यातील पटियाळाच्या पंताडा येथील कांगथला गावात उघडकीस आली आहे. आरोपी मुलाने धारदार शस्त्राने आईच्या शरीराचे दोन तुकडे केले आणि घराबाहेर तिला जाळले.

परमजीत कौर (50) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपींमध्ये परमजीत कौरचा मोठा मुलगा गुरविंदर सिंग उर्फ ​​गिंडा (28) आणि त्याचे दोन मित्र राजिंदर सिंग उर्फ ​​राजा आणि रणजित सिंग उर्फ ​​राणा यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्याच्या आईने ड्रग्जसाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपी गुरविंदर सिंगने तिची हत्या केली. तर पांतडा पोलीस स्टेशनचे अधिकारी मनप्रीत सिंग यांनी सांगितले की, याप्रकरणी आरोपी आणि त्याला हत्येमध्ये मदत करणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.