जळगावात सेवानिवृत्त जवान शिवाजी शिंदे यांचा नागरी सत्कार.!

0

जळगाव, – ईश्वर कॉलनी येथील आर्मी सैनिक शिवाजी सुभाष शिंदे हे २६ वर्ष प्रदीर्घ देशसेवा देऊन नुकतेच ता. १ जुलै रोजी मणिपूर येथून निवृत्त झाले. याप्रसंगी ता. २ जुलै रविवार रोजी त्यांचा नागरी सत्कार जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे व महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे महानगराध्यक्ष व जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंता एच. एच. चव्हाण, नगरसेवक कुंदन काळे, नवयुवक मराठा विकास मंडळाचे अध्यक्ष संजय मराठे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन सरोदे हे उपस्थित होते.

शिवाजी शिंदे यांचे ता. २ जुलै रविवार रोजी सकाळी ७ वाजता रेल्वे स्टेशनवर आगमन झाले यावेळी त्यांचे आप्तस्वकीय व नातेवाइकानी फटाक्यांची आतषबाजी करीत त्यांचे स्वागत केले. यानंतर शहरातील चिमुकले राम मंदिर वरून सुशोभित केलेल्या व तिरंगाने सजलेल्या जीपमधून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, “वीर जवान तुझे सलाम”,जय जवान जय किसान अशा घोषणांनी शहरातील रस्ते दुमदुमून गेले होते. यावेळी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी त्यांचे औक्षण व रांगोळी काढण्यात आली होती. या कार्यक्रमाला मराठा उद्योजक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव मराठे, विष्णूआप्पा बाळदे, बापूराव काळे, राहुल सोनवणे व मनोज चौधरी हे उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमाला दिपक चौधरी, संजय कोरके, नाना सोनवणे, तुषार अत्तरदे, सोनू चौधरी, रमन साखला, ज्ञानेश्वर जाधव, गणेश बोंडे, शुभम शिंदे यांचे सहकार्य लाभले. यावेळी आभार प्रर्दशन विजय सुभाष शिंदे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.