लोकशाही न्यूज नेटवर्क
आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेतेसाठी हार्दिक पंड्याची नोवाद केली गेली आहे. गेली १० वर्ष रोहित शर्मा हा संघाचं नेतृत्व करतांना दिसून आला होता. हार्दिकला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईच्या फॅन्समध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
हंगाम सुरु होण्यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याबाबत हि मोठी बातमी आहे. ज्यामुळे मुंबईच्या टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलं आहे. माध्यमातील वृत्तानुसार, दुखापतीमधून पूर्णपणे सावरू न शकलेला हार्दिक पंड्या आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा होण्यापूर्वी भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतही हार्दिक पंड्या खेळताना दिसून येणार नाहीये
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘हार्दिकच्या फिटनेसबाबत कुठलीही अपडेट आलेली नाही. आयपीएल सुरु होण्यापू्र्वी तो येणार का? यावर प्रश्नचिन्ह आहे.’