बापरे.. जास्त आनंदामुळे ओढाऊ शकतो मृत्यू !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

हृदयविकारामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. ताण तणाव अथवा इतर गोष्टींमुळे हृदयविकार झाल्याने मृत्यू होतो. पण जास्त आनंदामुळे (happiness) देखील हृदयविकाराचा झटका येवून मृत्यू ओढवू शकतो. यावर तुमचाही विश्वास बसणार नाही.

मात्र जपानमध्ये (Japan) झालेल्या एका अभ्यासातून हे समोर आले आहे. जास्त आनंद आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, अशी धक्कादायक बाब अभ्यासातून समोर आली आहे. हे सगळं ऐकून तुमचं मन भटकलं असेल. आनंद ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या भावना वाढत असतात. चला तर मग जाणून घेऊया काय हे संशोधन.

अभ्यासातून कोणता खुलासा ? 

जपानमधील हिरोशिमा सिटी हॉस्पिटलचे (Hiroshima City Hospital) डॉ. हिकारू सातो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात अति आनंदाबाबत मोठा खुलासा केला आहे. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, अति आनंदाच्या स्थितीत लोकांना ‘हॅपी हार्ट सिंड्रोम’ (Happy Heart Syndrome) होण्याची शक्यता असते. याला ताकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी असेही म्हणतात. त्यामुळे काहींना हृदयविकाराचा झटका येतो. या सिंड्रोममुळे व्यक्तीच्या हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. ज्यामुळे रक्त पंप करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. एकूणच ही समस्या तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

कोणता सिंड्रोम आहे ?

या अभ्यासात असे दिसून आले आहे की, हा सिंड्रोम महिला आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सर्वात जास्त प्रभावित करतो. या अभ्यासात सहभागी संशोधकांचे म्हणणे आहे की हॅपी हार्ट आणि ब्रोक हार्ट सिंड्रोममुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. केवळ क्वचित प्रसंगी या सिंड्रोममुळे लोक आपला जीव गमावतात. याशिवाय हृदयाचे नुकसान होण्याचा धोकाही खूप कमी असतो. यामुळेच लोकांना जास्त घाबरण्याची गरज नाही. मात्र जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्याबद्दल तज्ञांशी संपर्क साधता येईल. हे सिंड्रोम उपचारांद्वारे दूर केले जाऊ शकते.

 हॅपी हार्ट सिंड्रोमची लक्षणे ?

छातीत दुखणे आणि तीव्र ताणानंतर श्वास लागणे ही या दोन्ही सिंड्रोमची मुख्य लक्षणे आहेत. याशिवाय हा सिंड्रोम इलेक्ट्रोकार्डियोग्राम विकृती आणि डाव्या वेंट्रिकलच्या फुग्यातील समस्यांमुळे होऊ शकतो. जर तुम्ही त्यावर उपचार केले तर तुम्ही एका महिन्यात पूर्णपणे बरे होऊ शकता. विशेष म्हणजे ब्रोक हार्ट आणि हॅपी हार्ट सिंड्रोमची लक्षणे सारखीच असतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.