शिंदे सरकार 100 दिवसांचं संकल्पपत्र आणणार, मुख्यमंत्री फेलोशिप पुन्हा सुरू होणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्य सरकार विकासकामांवर भर देत असून जलद गतीने महत्वाचे निर्णय घेतले जाऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जात आहे. शिंदे फडणवीस सरकार शंभर दिवसांचं संकल्पपत्र आणणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या विकास कामांना गती देण्यासाठी एक संकल्प पत्र तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने तरुणांना प्रोत्साहन मिळून या योजनेने त्यांना नव्या जोमाने उभारी देखील मिळेल.

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतांना हाती घेण्यात आलेला मुख्यमंत्री फेलोशिप हा उपक्रम आता पुन्हा सुरू होणार आहे. चार-पाच जणांच्या एका गटाकडे एक सरकारी विभागाची जबाबदारी दिली जायची. यानंतर त्या विभागातील योजनांना गती देणे, फॉलोअप, नवीन कल्पना सुचविणे हे कामं तरुणाई करायची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागप्रमुखांना पत्र पाठवलं गेलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.