पहूर :- मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेऊन धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी एका विरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पहूर,कसबे भागात राहणाऱ्या आरोपी समीर मज्जित तडवी त्याने 19 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपल्या मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून धार्मिक भावना दुखावल्या दुखावल्या अशी फिर्याद शिवराज भास्कर देशमुख यांनी दिल्यावर पोलीस स्टेशनला संशयित समीर तडवी याच्याविरुद्ध भादवि कलम -295 (अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस उप निरीक्षक संजय बनसोड करीत आहे.