वासरू घराकडे गेल्याच्या कारणावरून एकास मारहाण

0

जामनेर ;- घराकडे वासरू गेल्याच्या कारणावरून याचे वाईट वाटून दोन जणांनी एकाला चाप्टा बुक्क्यांनी मारहाण करून लाकडी काठीने मारून दुखापत केल्याचा प्रकार तालुक्यातील हिवरखेडा बुद्रुक येथे 19 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की रविंद्र प्रभाकर कोळी वय 40 हे हिवरखेडा येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करतात. 19 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांचे वासरू संशयित आरोपी अमोल प्रकाश सावळे आणि माधुरी अमोल सावळे सावळे यांच्या घराजवळ गेले असता याचे वाईट वाटून त्यांनी रवींद्र कोळी यांना चापटा व त्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तसेच लाकडी काठीने त्यांच्या डाव्या बाजूला मारून दुखापत केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी रवींद्र कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहे को जयेंद्र पगारे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.