गुळवेल (भाग दोन)

0

लोकशाही विशेष लेख

 

गेल्या वेळी आपण गुळवेल या दिव्या औषधीचा महत्वाचा भाग बघितला आता बघूया गुळवेल च्या सेवाना संबंधी माहिती

सेवन विधी
गुळवेलचे (Gulavel) खोड औषधीकरिता उपयोगात आणतात. करंगळीएवढ्या जाडीचे एक फूट लांब कांड घेऊन त्यास कुटावे. त्यात ५-१० तुळशीची पाने घालावी व २ कप पाण्यात उकळावे. १/४ म्हणजेच १/२ कप होईपर्यंत आटवावे, नंतर गाळून १ चमचा मध घालून प्यावे. दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्यावे.
बाजारामध्ये गुळवेल सत्व, अमृतारिष्ट इत्यादी नावाने गुळवेल उपलब्ध आहे, परंतु ताजी गुळवेल वनस्पती अधिक प्रभावी आहे. मोसमी फ्लूसारख्या तापांकरिता ५-७ दिवस व अन्य व्याधींसाठी ३ आठवडे ते १/२ महिने किंवा अधिक काळाकरिता सेवन करावे.

गुळवेलीच्या भाजीचे औषधी गुणधर्म
गुळवेलीच्या कोवळ्या पानांपासून भाजी करतात. या भाजीने शरीरातील अग्नीचे वर्धन होते, त्यामुळे शरीरातील पचनाचे कार्य अधिक चांगले होते. कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये ताप येऊन गेल्यानंतर गुळवेळीची भाजी खाणे फायद्याचे ठरते. कावीळ कमी होण्यास मदत होते.

मधुमेहामध्ये ही भाजी पथ्यकर आहे. साखरेचा इष्टानिष्ट परिणाम शरीरावर होतो, त्यामुळे थकवा येतो, अशा अवस्थेत ही भाजी वरचेवर खावी. वरचेवर येणारी सर्दी, खोकला, ताप यासाठी गुळवेळीची भाजी हितावह ठरते.
त्वचेच्या विकारांचे मूळ कारण अनेक वेळा रक्तात असते. रक्तातील दोष नाहीसे करून, त्वचारोग कमी करण्यासाठी ही भाजी उपयोगी आहे. कामाचा अधिक ताण पडून शारीरिक थकवा येतो. तो दूर करण्यासाठी गुळवेलीची भाजी उपयोगी पडते.

औषध उपयोगी अंगे- खोड व पाने

मात्रा – वाळलेले खोड व पानाचे पूर्ण 1-3 चमचे दिवसातून 3-4 वेळा घेऊन वर दूध साखर घ्यावे.
काढा – 4-8 चमचे दिवसातून 2-3 वेळा घेऊन वर पाणी प्यावे.
गुळवेल सत्त्व – पाव ते अर्धा चमचा दिवसातून 3-4 वेळा घेऊन वर दूध साखर घ्यावी.

उपयोग
हृदयरोगात उपयोगी – गुळवेलीमुळे रक्ताभिसरण सुधारून हृदय बळकट होते. वृद्ध लोकांनी व हृदयविकाराच्या रुग्णांनी गुळवेलसत्त्व किंवा अमृतारिष्ट घ्यावे.
मुरलेल्या जुन्या तापामध्ये- गुळवेलसत्त्व फार गुणकारी ठरते. यकृतविकार, कावीळ- गुळवेलसत्त्व अर्धा चमचा अधिक हळद अर्धा चमचा अधिक मध 1 चमचा दिवसातून 3-4 वेळा देणे.

मधुमेहात उपयुक्त – गुळवेलीमुळे मधूमेही रुग्णांची रक्तामधील वाढलेली साखर कमी होते. तसेच मधुमेहामध्ये होणारे मज्जादाह(न्यूरायटिस), अंधत्व (आॅप्टिक न्यूरायटिस) इत्यादी उपद्रव टळण्यास मदत होऊन प्रतिकारशक्ती वाढते.
शुक्रधातूवर्धक (व्रण्य)- स्त्री-पुरुषांच्या जननसंस्थेच्या विकारावर गुळवेल फार उपयोगी आहे. गुळवेलीचे चूर्ण घेऊन वर दूध साखर घ्यावे.
रसायन कार्यासाठी – प्रत्येकाने दररोज सकाळ व संध्याकाळ 1-1 चमचा घेऊन वर गाईचे दूध पिल्यास आरोग्य चांगले राहून तारुण्याचे रक्षण होते. मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमधील प्रा. डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी केलेल्या संशोधनात गुळवेलीमुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते व निरोगी राहते असे आढळून आले आहे.

पंडुरोग रक्तक्षय– गुळवेल रक्त घटक वाढवते. गुळवेलसत्त्व वा अमृतारिष्ट घ्यावे.
मानसिक ताणतणाव कमी होतो- गुळवेलीमुळे मानसिक ताणतणाव कमी होतो. असे आता अधुनिक शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झाले आहे. गुळवेलीचा परिणाम अॅतड्रिनल या अंत:स्रावी ग्रंथीवर होऊन त्या ग्रंथीच्या अॅेड्रिनॅक्लीज या अंत:स्रावावर नियंत्रण येते. या अंत:स्रावामुळे यकृतातून रक्त प्रवाहात जी शर्करा मिसळली जाते. गुळवेलीमुळे इन्शूलिन या अंत:स्रावाची शर्करेवर चांगली प्रक्रिया होऊन परिणामी रक्तामधील साखरेचे नियंत्रण राखले जाते. त्याचा मधुमेहीला चांगलाच उपयोग होतो.

संतोष ढगे, सांगली
८२०८४२६४९४

Leave A Reply

Your email address will not be published.