नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र आणि गोवा राज्य निर्देशक प्रकाशमनुरेंची भडगावला भेट

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

भारत सरकारच्या युवा आणि खेल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्राचे राज्य निर्देशक प्रकाश जी मनुरे सर यांनी भडगाव येथील ममता युवा मंडळाला भेट दिली. यावेळी यशवंत पाटील सर मंडळाचे अध्यक्ष प्रतिक यशवंत पाटील, शुभम रणदिवे, अश्विनी सोमवंशी, नेहा मालपुरे, दर्शना गोसावी, साक्षी सोमवंशी आदी मंडळ सदस्य उपस्थित होते. स्टेट डायरेक्टर प्रकाश मनुरे सरांसोबत जळगाव जिल्हा नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र जी डागर, युथ लीडर तेजस पाटील उपस्थित होते. यावेळी युवा मंडळाला नेहरू युवा केंद्रांच्या उपक्रमाविषयी माहिती व मार्गदर्शन केले. ममता युवा मंडळाकडून राज्य निर्देशक प्रकाश मनुरे सरांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.