पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचा ‘हा’ खळबळजनक दावा, वाचा सविस्तर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडून गेल्या. ज्याचा आपण कधी विचार केला नव्हता त्या सर्व गोष्टी घडतांना दिसून येत आहे. अजून एक खळबळजनक दावा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला आहे. राष्ट्रवादी बरोबर आता काँग्रेसचे (Congress) देखील आमदार फुटणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुढे ते म्हणाले, ते कोणाकडे जातील हे मात्र सांगता येणार नाही. त्यांच्या या नव्या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जळगावात प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना गुलाबराव पाटील यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील
काँग्रेसचे आमदारही तयारीत आहे, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. पुढे ते म्हणाले कुणाकडे जातील हे सांगता येणार नाही. पण जातील नक्की. अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत येतील याची कल्पना होती का? असं विचारलं असता, गुलाबराव पाटील म्हणाले की, कुणालाच याची कल्पना नव्हती. मात्र दोन महिन्यापूर्वीच मी माझा अंदाज सांगितलं होता. आणि आज तो खरा ठरला आहे. असं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.