गुजरात निवडणुकीचे बिगुल वाजले; तारखा जाहीर

0

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गुजरात विधानसभा निवडणुकीचे (Gujarat Assembly Elections) बिगुल वाजले आहेत. ही निवडणुक दोन टप्प्यात होणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची (BJP) सत्ता असलेल्या गुजरातच्या (Gujarat) यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

आज निवडणुक आयोगाने (Election Commission) पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोरबी पुल दुर्घटनेत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी गुजरात निवडणूकसंदर्भात भाष्य केलं. गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत आज घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणुक दोन टप्प्यात होणार आहे. १ आणि ५ डिसेंबरला गुजरात निवडणुक पार पडणार आहे. तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

गुजरातमध्ये ४.९ करोड मतदान होणार आहे. महिलांसाठी १२७४ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दिव्यांगासांठी खास १८२ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.

गुजरातचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

पहिला टप्पा-

निवडणुकीसाठीचे नोटिफिकेशन- ५ नोव्हेंबर २०२२

अर्ज दाखल करण्याची मुदत- १४ नोव्हेंबर २०२२

अर्ज छाननी प्रक्रिया- १५ नोव्हेंबर २०२२

उमेदवारी माघार घेण्याची मुदत-  १७ नोव्हेंबर २०२२

मतदानाची तारीख- १ डिसेंबर २०२२

दुसरा टप्पा- 

निवडणुकीसाठीचे नोटिफिकेशन- १० नोव्हेंबर २०२२

अर्ज दाखल करण्याची मुदत- १७ नोव्हेंबर २०२२

अर्ज छाननी प्रक्रिया- १८ नोव्हेंबर २०२२

उमेदवारी माघार घेण्याची मुदत- २१ नोव्हेंबर २०२२

मतदानाची तारीख- ५ डिसेंबर २०२२

मतमोजणी- ८ डिसेंबर २०२२

 

Leave A Reply

Your email address will not be published.