‘बिआर चोप्रा’ यांच्या महाभारतातील ‘शकुनी मामा’ काळाच्या पडद्याआड

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

‘बिआर चोप्रा’ (BR Chopra) यांच्या ‘महाभारतातून’ (Mahabharata) खरी ओळख मिळालेले ‘गुफी पटेल’ (Goofy Patel) यांनी ‘शकुनी मामांच्या’ (Shakuni Mama) भूमिकेला उत्तम न्याय मिळवून देत आपल्या अभिनयाची छाप पाडली. आणि रसिकांच्या मनात वेगळीच जागा निर्नाण केली. गुफी यांनी १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘रफ़ू चक्कर’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. महाभारत मध्ये शकुनी मामांची भूमिका साकारणारे गुफी पटेल यांचं वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान आज ५ जून रोजी त्यांनी अखेरचा स्वास घेतला. गुफी पटेल यांच्या पार्थिवावर आज ५ जून रोजी संध्याकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

गुफी पेंटल यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अभिनेत्री टीना घई यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती. त्यांच्या निधनाने चालते व मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. महाभारत मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेले गुफी पेंटल ‘अकबर बिरबल’, ‘सीआयडी’, ‘राधा कृष्णा’ या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले. त्यांनी कास्टिंग दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘कन्हैया लाल’ ही त्यांची शेवटची मालिका ठरली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.