सात महिन्यापुर्वी हरवलेला मोबाईल भडगाव पोलिसांच्या मदतीने मिळाला परत

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

भडगाव तालुक्यांतील बांबरुड बु. येथील अनिल बाबुलाल तोतला यांचा सात महिन्या पुर्वी पंचवीस हजार रुपये किमतीचा ओप्पो रीमो हा मोबाईल हरवला होता. या बाबत अनिल तोतला यांनी भडगाव पोलिस स्टेशनला प्रॉपर्टी मिसीग रजिस्टर नंबर २५३/२०२२ मोबाइल हरवल्या बाबत तक्रार दाखल केली होती. याबाबत भडगाव पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाने पो.काँ सुनिल राजपूत, पो.काँ प्रविण परदेशी यांनी सदर मोबाईल चे लोकेशन ट्रॅप करत खरगोन जि.खरगोन (मध्य प्रदेश) येथे जावुन प्रापर्टी मिसिग मधील मोबाईल हस्तगत करुन सदर मोबाईल अनील तोतला यांना आज परत करण्यात आला. या बाबत सातमहिन्यानंतर न मिळणारा पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाइल परत मिळाला म्हणुन पो.काँ सुनिल राजपूत, पो.काँ प्रविण परदेशी यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.