राजस्थानात गोळीबार, करणी सेनेच्या प्रमुखाची घरात घुसून हत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय करणी राजपूत सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर वातावरण तापले आहे. करणी सेनेकडून बुधवारी राजस्थान बंदची हाक देण्यात आली आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीचा दोन निकाल लागला. यात काँग्रेसचा पराभव झाला असून, भाजपचा विजय झाला. आता करणी सेनेच्या अध्यक्षांच्या हत्येवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

गोगामेडी यांच्या हत्येनंतर भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहे. निवडणूक ठरल्याचा बदल म्हणून काँग्रेसची ही योजना होती. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ते म्हणताय की पोलिसांना गोगामेडी यांच्या हत्येच्या शक्यतेची टीप मिळाली होती. पण, काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली.

गोगामेडी यांच्या घरात तीन हल्लेखोरांनी प्रवेश केला होता. चर्चा सुरु असतानाच त्यांनी हल्ला केला आणि गोगामेडी यांच्यावर गोळ्या चालवल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. गोगामेडी यांचा सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. तर, एका हल्लेखोराचा प्रतिहल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. सदर घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.