धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
धुळ्यातून एक धक्कादायक समोर आली आहे. धुळ्यात एका व्यक्तीने त्याच्या ४ वर्षीय भाच्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रॉड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
चिमुकला घराबाहेर अंगणात खेळत होता. मात्र, काही वेळेनंतर घरातील सदस्यांना दिसलाच नाही. त्यामुळे घरातील सदस्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली. त्यावेळी चिमुकला बाहेर कुठेही सापडला नाही. त्यामुळे घरातील लोकांनी शेजारीच असलेल्या बाथरूममध्ये पाहणी केली.
त्यावेळी या चिमुकल्याचा मामा त्याला पाण्याच्या टाकीत बुडवून शेजारी बसल्याच आढळून आलं आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने चिमुकल्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी चिमुकल्यास मृत घोषित केले. मामाने अशा प्रकारचे कृत्य का केले? याबाबत सध्या परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विचित्र घटनेनंतर खळबळ उडाली आहे.
चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित मामाच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला ताब्यात देखील घेतलं आहे.या मामाने अशा प्रकारचे कृत्य का केले, याचा तपास चाळीसगाव रोड पोलीस करीत आहेत.