रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोने- चांदीला चकाकी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज भाऊ बहिणीच्या प्रेमळ नात्याच्या दिवस म्हणजे रक्षाबंधन आहे. देशासह राज्यात देखील मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे केले जात असून या सणानिमित्त सोने-चांदी बाजारात देखील खरेदीची लगबग सुरू आहे.  मात्र आज ऐन खरेदीच्या दिवशी सोने चांदीचे भाव वधारले आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज वेबसाईनुसार, सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव थेट 55,760 रुपयांवर पोहचला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60,830 रूपये आहे. त्याचबरोबर गुडरिटर्न्सनुसार बुधवारी, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 55,000 रुपये सुरू आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60 हजार रुपये आहे.

 10 ग्रॅमनुसार 22 कॅरेट सोन्याचा दर 

पुणे- 55,000 रुपये

मुंबई – 55,000 रुपये

नागपूर – 55,000 रूपये

 10 ग्रॅमनुसार  24 कॅरेट सोन्याचा दर 

पुणे- 60,000 रूपये

मुंबई – 60,000 रूपये

नागपूर – 60,000 रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.