सोन्याच्या दरात तेजी; चांदीत घसरण, जाणून घ्या आजचे भाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहेत. तसेच तुळशी विवाहानंतर सोन्याच्या दरात तेजी दिसून आली. आज देखील सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजनुसार (Multi Commodity Exchange)  सोन्याचा (Gold) भाव 0.03 टक्क्यांनी वाढला आहे. तर चांदीचा (Silver) दर 0.09 टक्क्यांनी कमी झाला आहे.

 आजचा सोन्याचा भाव

आज सोन्याच्या दरात तब्बल 600 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे 24 कॅरेट शुद्धतेच्या सोनाचा भाव प्रतितोळा 52 हजारांवर गेला आहे. 24 कॅरेट सोन्याचा सध्याचा भाव प्रतितोळा 52 हजार 124 इतका आहे.

आजचा चांदीचा भाव

सोन्याच्या दरात वाढ होत असताना चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या दरात 0.06 टक्क्यांनी घसरण झाली. त्यामुळे एक किलो चांदाचा भाव 61,853 रुपयांवर आला आहे. सराफा बाजार उघडताच, चांदीचा भाव 62,005 रुपयांवर गेला होता. मात्र, त्यानंतर चांदीच्या भावात मोठी घसरण झाली.

जळगावातील सोने- चांदीचा दर 

जळगाव (Jalgaon) येथील सराफ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचा सोन्याचा भाव  52,250 रुपये तर चांदीचा भाव 61,900 रुपये आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.