सोन्याच्या दरात प्रचंड तेजी; प्रत्येक क्षणाला बदलताय दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. यामुळे सोन्याची (Gold) प्रचंड मागणी वाढली असून सोने खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यातच प्रत्येक क्षणाला सोन्याच्या दरात बदल होत आहेत.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजनुसार (Multi Commodity Exchange) आज सोन्याच्या दराने (Gold Rate) 54 हजारांचा उंबरठा ओलांडला आहे. तर प्रत्यक्ष जळगाव (Jalgaon) शहरातील सराफ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर 53850 रुपये आहेत. तसेच सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून आता 56 हजारापर्यंत दर पोहोचणार का? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

आज भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदीचे दर वधारले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर 10 टक्क्यांने वाढले आहेत. वायदे बाजारात चांदीचा भाव आज कालच्या बंद भावापेक्षा 0.54 टक्क्यांनी वाढले आहेत.

आज वायदे बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 54,330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. शेअर बाजार उघडताच 54 हजार 197 रुपये दर होता. आता तो वाढून 54 हजार 330 पर्यंत पोहोचला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.