रोटरी क्लबने ज्येष्ठ महिलांना घडविले देवदर्शन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रोटरी क्लब जळगावतर्फे नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट संपन्न झाला. ममुराबाद येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या 31 ज्येष्ठ महिलांसाठी पद्मालय देवस्थान व जळगावातील जलाराम मंदीर यांचे दर्शन व नंतर चेतना व्यसनमुक्ती केंद्रात भोजन असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

पद्मालयचे गणपती मंदीर आणि जलाराम मंदिरांचे महिलांनी दर्शन घेतले. त्यांनतर चेतना व्यसनमुक्ती केंद्रात त्यांच्याशी पी. पी. नितीन विसपुते यांनी संवाद साधला. त्यांना आपले स्वास्थ्य व आरोग्याचे महत्व या विषयावर जुन्या परंपरांचे आणि महाराष्ट्रातील अनेक थोर संतांचे दाखले देऊन आनंदी कसे रहावे यावर मार्गदर्शन केले.

यावेळी राजेश वेद, सुबोध सराफ, कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. तर या महिलांनीही उत्स्फूर्तपणे भक्ती गीते सादर केली. तसेच रोटरी क्लब जळगावचे आभार मानले.

या प्रोजेक्टसाठी पी. पी. कॅप्टन मोहन कुलकर्णी व पी. पी. जितेंद्र ढाके यांनी मेहनत घेतली. अध्यक्ष राजेश वेद, जितेंद्र ढाके, नितीन विसपुते, सुबोध सराफ, मुकेश महाजन, सुरेश केसवाणी, अरविंद हसवाणी, चंदन महाजन, हेमिन काळे, मोहन कुलकर्णी आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.