सोन्याच्या दरात तेजी कायम; जाणून घ्या जळगावातील भाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरातील तेजी कायम आहे. सराफ बाजारातील तज्ज्ञांच्या मते, लोकांना अजूनही स्वस्त सोने-चांदी खरेदी करण्याची संधी आहे. कारण येत्या काही दिवसांत सोन्यासोबतच चांदीच्या दरातही आणखी वाढ होऊ शकते.

जळगाव येथील सराफ व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या सोन्याचा दार 49700 रुपये आहे. तर चांदीचा दर 65100 रुपये आहे.

बुधवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सराफ बाजार बंद राहिला. याआधी मंगळवारी सोने प्रति दहा ग्रॅम 68 रुपयांनी महागून 48861 रुपयांवर बंद झाले. सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 48,793 रुपयांवर बंद झाले होते. तर चांदी 710 रुपयांनी स्वस्त होऊन 63712 रुपये प्रति किलोवर बंद झाली. याआधी सोमवारी चांदी 64422 प्रति किलोच्या दराने बंद झाली होती.

मंगळवारी 24 कॅरेट सोने 48861 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 48665 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 44757 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 36646 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने सुमारे 12485 रुपये होते. प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यापार करत होता.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.