सोन्याला झळाळी ,चांदीही चकाकली ; जाणून घ्या आजचे दर

0

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला . अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने देशातील सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली. तर आज सोन्या चांदीच्या भावात कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले . जळगावच्या सुवर्णबाजारात आज सोन्याला प्रति १० ग्राम ५८ हजार ४७० इतका भाव होता.

१ फेब्रुवारीच्या तुलनेत आज सोन्याच्या भावाने ५४० रुपयांची उसळी घेत नववर्षांआतील विक्रमी भाव नोंदविला असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

 

तर चांदी प्रति किलो ६९ हजार ४७० रुपये १ फेब्रुवारी रोजी असताना आज गुरुवार रोजी चांदी प्रतिकिलो १४०० रुपयांची वाढ झाल्याने ७१ हजार ३७० रुपये इतकी विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोने चांदीच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.