सोने ७० हजारांवर जाणार ; गाठली आता विक्रमी पातळी

0

 

मुंबई ;- सोने खरेदी करणा-यांसाठी निराशाजनक बातमी असून सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. लग्नसराईच्या काळात ही वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज सोन्याचा दर हा जीएसटीसह ६६,८०० रुपयांवर पोहोचला आहे.

सोन्याचे दर हे ७० हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मागील दोन दिवसात जवळपास सोन्याच्या दरात अडीच हजारांची वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर महागले आहेत. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षेने सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकानी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून अनेक गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळवला आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याचे मागणीत मोठी वाढ होऊन सोन्याच्या दरात तीन दिवसांत तब्बल दोन हजार रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तीन दिवसांपूर्वी सोन्याचे दर जीएसटीसह ६४१०० होते तेच सोन्याचे दर आज तब्बल ६६८०० इतक्या उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. आजवरचे सोन्याचे दर हे सर्वाधिक उंचीवर असल्याचे सोने व्यावसायिकांनी सांगितले आहे. आगामी काळात अजूनही सोन्याचे दर वाढ होऊन ७०००० हजार रुपयांच्यापर्यंत जाण्याची शक्यता सोने व्यापा-यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.