मुंबई ;- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीची 50 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीने कन्नड सहकारी साखर कारखान्याची 50.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या मुंबई युनिटने कन्नड, औरंगाबाद येथे असलेल्या बारामती ॲग्रो लिमिटेडच्या साखर युनिटची 161.30 एकर जमीन, प्लांट आणि मशिनरी आणि इमारती जप्त केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने बारामती ॲग्रो लिमिटेडला साखर कारखान्यांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. रोहित पवार हे बारामती ॲग्रो लिमिटेडचे सीईओ आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पवार कुटुंबाविरोधात ईडीची ही सर्वात मोठी कारवाई आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणी ईडीची कारवाई सुरू होती. जानेवारी महिन्यात ईडीच्या अनेक पथकांनी पुणे, बारामती आणि रोहित पवारच्या कंपनीशी संबंधित ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने रोहितला अनेकवेळा चौकशीसाठी बोलावले होते.
38 वर्षीय पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार आहेत.