मकर संक्रांतीला सोन्या चांदीची उसळी ; जाणून घ्या आजचे भाव

0

जळगाव /मुंबई ;- एकीकडे सोने आणि चांदीच्या दरात चड उतार मागील आठवड्यात पाहायला मिळाले. मात्र आज हिंदू धर्मियांचा महत्वाचा सण असलेल्या मकर संक्रातला या मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले .

जळगावच्या सुवर्ण बाजारात आज सोने प्रति दहा ग्रॅमला ६२ हजार ७१० इतके होते. कालच्या तुलनेत यात १८० रुपयांची वाढ झालेली दिसून आली. तर चांदी चे भाव आज प्रतिकिलो ७२ हजार ७०० रुपये इतके होते यात १४० रुपयांची वाढ झाली.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,८५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,६३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७२,९२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,६९० रुपये प्रतिकिलो होती.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,५०३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,७३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,५०३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,७३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,५०३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,७३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,५०३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,७३० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.