सोन्या – चांदीची झळाळी ! ऐन लग्न सराईत गाठला उच्चांक !

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागणी जास्त असल्याने सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहेत.आज (५ मे ) पुन्हा उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागणी जास्त असल्याने सोने आणि चांदी सारख्या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहेत.

सध्या लग्नसराईचा मौसम असल्याने व अंतरराष्ट्रीय बाजारात सोने वधारल्याने सोन्याच्या भावाने दराने सर्वोच्च पातळी गाठल्याने सोने आज जळगावच्या सुवर्ण बाजारात सकाळी ११ वाजेपर्यंत प्रति तोळा ६१ हजार ५८० रुपये इतका भाव मिळाला . तसेच चांदीच्या दरानेही सर्वोच्च पातळी गाठून चांदी प्रति किलो ७८ हजार ४० इतका दर मिळाला आहे.

सोन्याने नवीन विक्रम केला आहे. प्रति तोळा ६१ हजार इतका दर गाठला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे पण भारतात आपण सोन्याकडे फक्त गुंतवणूक म्हणून बघत नाही तर ते स्त्रीधन असते. म्हणून ग्राहक अजूनही सोने खरेदीला पसंती देतात.

Leave A Reply

Your email address will not be published.