गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे गजर विठू नामाचा मैफलीचे आयोजन

0

जळगाव ;- येथिल गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे प्रतिवर्षी मृगोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा गजर विठू नामाचा या सुरेल मैफीलीचे आयोजन करण्यात आले आहे.गोदावरी संगीत महाविद्यालय भास्कर मार्केट येथील सभागृहात शनिवार दि २४ जून रोजी सायं ६ वा. गजर विठू नामाचा ही संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन,गोदावरी फॉउंडेशनच्या सदस्य प्रसिध्द रेडीओलॉजीस्ट डॉ. केतकीताई पाटील,प्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, गोदावरी फॉउंडेशनचे प्रेरणास्थान श्रीमती गोदावरी पाटील यांची प्रमुख उपस्थीती असणार आहे. तरी जास्तीत जास्त संगीत प्रेमींनी उपस्थीती दयावी असे आवाहन प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ गोदावरी फॉउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षाताई पाटील आणि संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्य पदमजा नेवे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.