नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल — पो.उ.नि. राजेंद्र सोनवणे

0

जळगाव ;- रस्ता सुरक्षा नियम पाळा, आणि अपघात टाळा,नियमांचे पालन केल्यास अपघाताच्या संख्येत घट होवू शकते. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे नियम जाणून घ्या. तुमचे आणि रस्त्यावरील इतर ड्रायव्हर्सचे संरक्षण करण्यासाठी रहदारीचे नियम तयार केले आहेत. प्रत्येक देशाचे सरकार काही नियम आणि कायदे आखते आणि ते त्या देशातील लोकांना लागू करते. देशाच्या उत्तम वाहतूक व्यवस्थेसाठी बनवले जाणारे वाहतूक नियम विषयी प्रत्येकास माहित असावेत.असे प्रतिपादन महामार्ग वाहतूक शाखा जळगाव पो.उ.नि. राजेंद्र सोनवणे यांनी आज केले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अधिष्टाता डॉ. एन एस आर्विकर, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड,पॅथालॉजी विभागाचे डॉ. नितीन भारंबे, औषधशास्त्र विभागाचे डॉ. बापुराव बिटे, इ मान्यवर उपस्थीत होते. पुढे बोलतांना रस्त्यांचे रहदारीचे नियम हे दोन्ही कायदे आणि अनौपचारिक नियम आहेत; जे वाहतुकीचा सुव्यवस्थित आणि वेळेवर प्रवास सुलभ करण्यासाठी केले आहेत. हे नियम पाळले तर, ९९% रस्ते अपघात संपतील. कामकाज सुरळीत व कार्यक्षम होण्यासाठी सर्वत्र नियम असणे आवश्यक आहे.रस्त्यावरील अपघातांमुळे दररोज शेकडो मुले जखमी होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. रस्ता सुरक्षा सिग्नल जाणून घ्या- मुख्य ट्रॅफिक लाइट्स आणि सिग्नल्स जे मुलांना माहित असले पाहिजेत रस्ता ओलांडताना खालीलप्रमाणे काळजी घ्या चालत्या वाहनांमध्ये सुरक्षिततेचा सराव करणे,सायकल काळजीपूर्वक चालवणे,वाहनांमध्ये चढताना आणि बाहेर पडताना सुरक्षितता पाळणे,रस्त्यावर चालताना कधीही मल्टीटास्क करु नका,मुलांना पादचारी क्रॉसिंग वापरण्यास शिकवा,रस्त्यावर असताना अति उत्साह टाळा,वाहनाचे दार उघडणे,मुलांना कारमध्ये एकटे सोडणे टाळा,शेजारी असताना सुरक्षितता,रहदारीची दिशा,रेल्वे क्रॉसिंगचे नियम रस्ता सुरक्षेच्या नियमांची माहिती नसणे, अननुभवीपणा आणि निष्काळजीपणा ही या परिस्थितीमागची प्रमुख कारणे आहेत. म्हणून प्रत्येकाने नियम माहित करून घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले.यावेळी त्यांचे सोबत हवालदार संजय यादे, हवालदार विशाल चव्हाण, पोलीस नाईक गिरीश शिंदे, पोलीस शिपाई सतीश बाविस्कर हे उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.