गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनमध्ये जागतिक दूरसंचार दिवस उत्साहात

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

मानवी जीवनात संप्रेषणाला खूप महत्त्व आहे. त्याशिवाय जगाची कल्पनाच करता येत नाही. लोक एकमेकांशी संवेदनानेच जोडलेले राहतात. त्यामुळे दरवर्षी जागतिक दूरसंचार दिन त्याच्या महत्त्व विषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. त्या अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जागतिक दूरसंचार दिवसानिमित्त बुधवार१७ मे रोजी ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विशेष वक्ते श्री चेतन जाधव (नोडल ऑफिसर बीएसएनएल जळगाव) हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता) तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. राजेंद्र पाटील यांनी जागतिक दूरसंचार दिवस का साजरा केला जातो याविषयी बोलताना, हिस्टरी ऑफ वर्ड टेलेकम्युनिकेशनडे, सिग्निफिकन्स ऑफ वर्ड टेली कम्युनिकेशन डे याबद्दल माहिती दिली. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार यांनी इम्पॉर्टन्स ऑफ टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी यावर्षी जागतिक दूरसंचार दिनाची थीम माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाद्वारे सर्वात कमी विकसित देशांना सक्षम बनवणे आहे, हे नमूद केले. त्यानंतर बि.एस.एन.एल. येथील चेतन जाधव, नोडल ऑफीसर, भारत नेट प्रोजेक्ट, जळगांव जिल्हा यांनी टेलीकॉम इंडस्ट्रि क्षेत्रातील नविन तंत्रज्ञानाविषयी ऑन लाईन व्याख्यान दिले. फाईव्हजी सेवा व त्यांचे तंत्रज्ञान विषयी माहिती देताना या क्षेत्रात नवीन प्रकारची उपकरणे जसे की स्वीचेस, बीटीएस स्टेशन कशाप्रकारे वापरले जातात याची तुलनात्मक माहिती दिली. फोर जी सेवा व फाइव्ह जी सेवा पूर्ण झाल्यानंतर नवीन ६जी तंत्रज्ञान येणार आहे, त्याविषयी बोलताना त्यांनी कोण कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल व त्यांची समर्पक उत्तरे याबद्दल सविस्तर चर्चा केली.

कार्यक्रमाचे आयोजन प्रा.राजेंद्र पाटील यांनी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व विभाग प्रमुख प्रा. हेमंत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न केले. सदर कार्यक्रमाबाबत तसेच जागतिक दूरसंचार दिनानिमित्त गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी ई अँड टी सी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तसेच संपुर्ण प्राध्यापक वृंदानी आपला सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कोनीका पाटील (द्वितीय वर्ष) या विद्यार्थिनीने केले.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.