जागतिक हवामान बदल आणि पारंपारिक शेतीपुढील आव्हाने..!

0

लोकशाही विशेष लेख

 

जगभरात आज एकच चिंता व्यक्त केली जाते व ती म्हणजे कार्बन उत्सर्जन आणि जागतिक तापमान वाढ (Global temperature rise). याबाबत सखोल अभ्यास सुरू असून त्या अनुषंगाने शेती आणि तिचे पारंपारिक पीक पद्धत यात आता बदल करण्याची गरज अधोरेखित होत आहे. भारतात आणि विशेषत्वाने महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्याला लागून खानदेशमधील शेतकऱ्यांनी उत्पादक म्हणून शेतीत अमुलाग्र बदल केले आहेत.

दरवर्षी २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिवस म्हणून आपण साजरा करतो. हवामान आणि हवामानातील बदल या विषयावर लक्ष केंद्रित करताना तापमान वाढ (Global warming) चा विचार होणे गरजेचे आहे. वातावरणात रोज बदल होत राहिले तर पावसाळ्यावर त्याचा निश्चित परिणाम होतो. मग देशात काही भागात वादळी वारा, गारपीट तर काही भागात कडकव उन, ढगाळ वातावरण दिसून येते. शेतात ऊस, कापूस, पऱ्हाटी व बांधावरच्या झाडांचा पालापाचोळा न जाळता त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचे तंत्रज्ञान अवगत करून घेतल्यास सेंद्रिय शेती इतकेच खत व्यवस्थापन शेतात होऊ शकते. आपल्या देशात पन्नास वर्षाआधी चार महिने उन्हाळा तेवढाच पावसाळा आणि चार महिने हिवाळा हे ऋतू सारखे समप्रमाणात कार्यरत असत, परंतु आज जगात वाहनांमुळे, उद्योग व्यवसायामुळे, वाढत्या कारखानदारीमुळे कार्बन व उत्सर्जनचे प्रमाण बेसुमार वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढले आहे.

मानवी आरोग्याला ते घातक असून वृक्षतोड, जाळपोळ, आगी लागणे, भूकंप, ज्वालामुखीचा स्फोट या घटना वाढू लागले आहेत. तर तुर्कस्तानात भूकंपामुळे प्रचंड मानवी हानी झाली. वातावरणात उन्हाळ्यानंतर भर पावसात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात एल निनो च्या प्रभावामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ सदृश्य स्थिती दिसून येते. मान्सूनची कृपा ज्यावर्षी सातत्याने होते त्यावर्षी शेतकऱ्यांचा हंगाम चांगला येतो.

खानदेशात केळी, कापूस, ऊस ही बारमाही पिके घेतली जातात. अलीकडे टरबूज, काकडी, टोमॅटो व इतर नगदी पिकांकडे वळलेल्या शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळू लागले आहेत. बागायती क्षेत्रात केळीसाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे, परंतु हवामानाचा वेध आणि पर्यावरणीय बदल पाहता रावेर, जळगाव तालुक्यातील वाढोदा, भोकर भागात मोठ्या प्रमाणावर वादळ गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचे जुन्या नोंदी आहेत. तेथील शेतकऱ्यांनी खर्चिक पिकांऐवजी आता दुसऱ्या पिक उत्पादनाकडे लक्ष घातले पाहिजे तरच आपण यातून बचाव करू शकतो.

तेलबिया वर्गीय पिकांच्या बाबतीत खानदेशात सातपुडा लगतच्या भागात अनुकूल स्थिती आहे. त्याचाही विचार करण्याची गरज आहे. जळगावला कापूस व तेलबिया संशोधन केंद्र कार्यरत आहे. भुईमुग, तीळ, सूर्यफूल या तेलबिया वर्गीय पिकांसोबत सोयाबीनच्या नवीन संशोधित वाणांची शेतकऱ्यांनी निवड करावी.

 

 

 

 

 

 

रमेश जे. पाटील (शेतकरी)
आडगाव ता. चोपडा
९८५०९८६१००

Leave A Reply

Your email address will not be published.