गिरणा नदीपात्रात उडी घेऊन एकाची आत्महत्या

0

जळगावः वर्दळीचा रस्ता असलेल्या सुमारे शंभर फुट उंच असलेल्या बांभोरी पुलावरुन नदीपात्रात उडी घेत ज्ञानेश्वर गोंविदा नन्नवरे (कोळी) (वय ४५, रा. बांभोरी प्र. चा. ता. धरणगाव) यांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील बांभोरी गावात ज्ञानेश्वर गोविंदा नन्नवरे हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते शेतमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास ते घराबाहेर पडल्यानंतर ते गावाजवळच असलेल्या गिरणा नदीवरील गेले. याठिकाणी सुमारे शंभरफुट उंच असलेल्या पुलावरुन नदीपात्रात उडी घेतली. नदीपात्रात पाणी नसल्यामुळे त्याठिकाणावरील खडकावर आदळून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळेच ज्ञानेश्वर नन्नवरे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताचव रुग्णालयात दाखल केला.

रुग्णालयातील सीएमओ डॉ. रेणका भंगाळे यांनी ज्ञानेश्वर नन्नवरे यांची तपासणी करीत त्यांना मवत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी रुग्णालयता गर्दी केली होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.