कांद्याच्या दरात घसरण, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कांडा हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. परंतु हाच कांडा कधी शेतकऱ्यांना रडवतो. परंतु कांडा नागडी पीक असल्यामुळे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. यंदा देखील लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्याचवेळी कांद्याचे दर घसरले आहे. महिन्याभरात कांदा दर अर्ध्या किमतीवर आले आहे. नाशिक जिल्ह्यप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात कांद्याचे दर घसरले आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाहेर समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहे. सोलापूर शनिवारी जवळपास साडेपाचशे गाडी कांद्याची आवक झाली आहे.

नाशिकमध्ये कांद्याचे दर घसरले
दिवाळी निमित्त नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या १२ दिवस बंद होत्या. त्यानंतर मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरु झाला. कांद्याच्या भावात घसरण सुरु झाली. पांढ दिवसांपूर्वी कांद्याला सरासरी प्रति क्विंटल ३२०० ते ३५०० इतका भाव मिळत होता. त्यात क्विंटल मागे ३०० ते ८०० रुपये घसरण झाली आहे. ६ नोव्हेंबर रोजी कांदयाला जास्तीत जास्त ४ हजार रुपये दर होता. आता कांद्याला प्रति क्विंटल २६०० ते ३२०० इतका भाव मिळत आहे. यामुळे कांडा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याच्या दरातील घसरण रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.