जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचे प्रा. रफिक शेख यांचे पुस्तक प्रकाशित

0

जळगाव ;- जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील मास्टर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन विभाग प्रमुख प्रा. रफिक जे. शेख यांनी लेखन केलेल्या “मशीन लर्निंग एंड आर्टिफिशियल इंटेलिजेंस”’ या पुस्तकाचे प्रकाशन ता. ९ गुरुवार रोजी रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व रिसर्च एंड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.

अनेक विद्यार्थी हे त्यांच्या अभ्यासाठी अनेक परदेशी लेखकांच्या पुस्तकावर अवलंबून असतात. मात्र स्थानिक प्रेसमधून अशा प्रकारचे पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे ही चांगली बाब असल्याचे कौतुकोद्गार संचालक प्रितम रायसोनी यांनी काढले. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस स्थित्यंतर आणि अनेक बदल होताना दिसतात, कालपरत्वे विद्यार्थ्यांच्याही अपेक्षा असतात की त्यांना त्यांच्या महाविद्यालयांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे याचाच मागोवा घेवून प्रा. रफिक शेख यांनी लिहिलेले हे पुस्तक विध्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रा. रफिक शेख यांनी पुस्तकाची माहिती देतांना सांगितले कि, मानवाला जिथे विशेष बुद्धीची गरज पडते अशी बरीच कामे आता संगणक प्रणाली करू लागल्या आहेत. हे प्रकरण नक्की काय आहे? ती कशी कामी करतात ? या विविध प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “मशीन लर्निंग एंड आर्टिफिशियल इंटेलिजेंस”च्या क्षेत्रात माझे स्वलिखित पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यामुळे मला विश्वास आहे कि माझे हे स्वलिखित पुस्तक शास्त्रज्ञ, संगणक अभियंते, शैक्षणिक कर्मचारी आणि मशीन लर्निंग एंड आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थी व सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.