गायत्री ठाकूर हिस राज्य नाट्य स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अभिनयाचे प्रमाणपत्र…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या (Directorate of Cultural Affairs) वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा या नुकत्याच संपन्न झाल्या आहेत, आणि त्याचा निकालही जाहीर झाला आहे. यामध्ये जळगाव केंद्रावर सादर झालेल्या कलरबोव फाउंडेशन या संस्थेच्या “एक रोझ” नाटकातील अभिनेत्री “गायत्री ठाकूर” हिस अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे पारितोषिक तिने सलग दुसऱ्यांदा प्राप्त केले आहे. याआधी तिने “फक्त चहा” या नाटकासाठी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.
तिचे वडील मनोज ठाकूर (वाघ) यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले की, तिला जे क्षेत्र योग्य वाटते ते तिने आपल्यासाठी निवडावे, व त्यात नाव कमवावे. तिचे वडील आर. आर. शाळेत लिपिक या पदावर कार्यरत आहेत. गायत्रीला मुळात नृत्याची आवड, त्यामुळे तिने लावणीत विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. तिने नाट्यशास्त्र ची पदवी घेतली असून, तिने लोक कलाची देखील पदविका मुंबई विद्यापीठातून प्राप्त केली आहे.
अलीकडेच तिने मिस इंडिया हेरीटेज हा खिताब पटकावून जळगावचे नाव भारतभर गौरवान्वित केले आहे. तिच्या या दुहेरी यशाबद्दल कलरबोव संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.