Saturday, January 28, 2023

डोंबिवलीत चोरट्याने मेडिकल फोडले; केमिस्ट असोसिएशनचे पोलिसांना निवेदन

- Advertisement -

 

डोंबिवली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

डोंबिवली शहरात एकूण सात मेडिकल दुकाने चोरट्याने फोडल्याची घटना घडली आहे. लोढा, संगीतावाडी, नंदिवली रोड या परिसरातील जवळपास सात दुकाने दुकानाची शटर तोडून रोकड आणि मुद्देमाल चोरून नेला.

- Advertisement -

विशेष म्हणजे मानपाडा पोलीस चौकी समोर असलेलं एस एस मेडिकल दुकान फोडले. लोढा मधील निळजे मेडिकल, जनेरिकार्ट, गेटवेल मेडिकल तर संगीता वाडी सिद्धी मेडिकल, स्वामी मेडिकल तर नंदिवली रोड ला विजया लक्ष्मी मेडिकल हे दुकाने फोडली.

आज मानपाडा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पी आय शेखर बागडे यांना डोंबिवली असोसिएशनचे वतीने निवेदन देण्यात आले. विशेष पथक नेमून चोरट्यांना अटक करावी तसेच मेडिकल दुकानांमध्ये व्हिजिट बुक ठेवावे अशी मागणी संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशमुख, निलेश वाणी, दुधनाथ यादव यासह अन्य केमिस्ट व पदाधिकारी उपस्थित होते.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे