Saturday, January 28, 2023

जळगावात बेपत्ता तरुणाचा खून…

- Advertisement -

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जळगाव शहरातील मेहरूण परिसरातून दोन दिवसापूर्वी ३३ वर्षीय तरूण बेपत्ता झाला होता. दरम्यान आज दि. १२ रोजी बेपत्ता असणार्‍या तरूणाचा मृतदेह गिरणा नदी पात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३३) असे मयत तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

मेहरूण परिसरातील रहिवासी असलेला भूषण सुरेश शेट्टी (वय ३३) हा तरूण विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. शनिवारी दुपारपासून तो  बेपत्ता झाला होता. दरम्यान आज या तरुणाचा मृतदेह गिरणा नदीच्या जवळ असलेल्या महादेव मंदिराच्या खालील बाजूस आढळून आला.

सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत भूषण सुरेश शेट्टी यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात फिर्याद देण्याचे काम सुरु होते.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे