गॅसच्या भाववाढीमुळे ग्रामीण भागात चुली पुन्हा पेटु लागल्या !

0

मनवेल ता यावल : लोकशाही न्युज नेटवर्क
गँसचे सिंलेडर ११४० रुपयात मिळु लागल्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटु लागल्यामुळे सरपण जमा करण्यासाठी मजुरांची पुन्हा धावपळ सुरु झाली आहे.

घरातील निघणारा धुर कमी व्हावा ,महिलांच्या फुसफुसा आजार कमी करुन जंगल तोड कमी करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजनाअंर्तगत गोरगरीबांचा घराघरात गँस पोहोचले आहे. गँसचे भाव वाढल्यामुळे गँसचे खाली सिंलेडर आता रीकामे पडुन असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
गँसचे भाव वाढल्यामुळे ग्रामीण भागात कठीण झाले आहे.शासनाकडुन फत्त शंभर रुपयात गँस कनेक्शन मिळाल्यांने काही दिवस आंनद मिळाला आता गँसचे सिंलेडर भरण्यासाठी अकराशे चाळीस रुपये लागत असल्यामुळे महिलांचे आर्थिक नियोजन करावे लागत आहे. ग्रामीण भागातील महिलांकरीता स्वस्त मध्ये गँस दिले हळुहळु केद्र शासनाने भाव वाढविल्याने आर्थिक नियोजन बिघडले आहे. काम नाही,धंदा नाही जेमतेम मजुरी मिळत असुन कृटूंबाचे उदरनिर्वाह करावा लागत आहे. सिंलेडर भरण्यासाठी पैसा जमा करण्यांचे मजुरां समोर आव्हान आहे.११०८ रुपयाचा सिंलेडर व ३० रुपये भाडे ११४० रुपयात भरलेले सिंलेडर मिळत असल्यामुळे महिलांना पुन्हा चुली पेटवित असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसुन येत आहे.

(शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत शंभर रुपयात गँस कनेक्शन मिळाले.गँसच्या वापर करण्याची सवय पडली.दोन महीने एक सिलेंडरचा वापर होता.सबसीडी मिळत असल्यामुळे सिलेंडर भरणे परवड होते मात्र शासनाने सिलेंडर वरील सबसीडी बंद केल्याने आता महागे सिलेंडर परवड नाही.त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे.)
कस्तुराबाई कोळी
शेतमजुर महीला मनवेल

Leave A Reply

Your email address will not be published.