गंगा नदीत 40 प्रवासी असलेली बोट उलटली; ३ महिला ठार…

0

 

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

उत्तर प्रदेशातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बलिया येथे गंगा नदीत 40 प्रवासी असलेली बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला. तर चार महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ३५ ते ४० जण बोटीत बसून नदीच्या दुसऱ्या टोकाकडे जात होते, त्याचवेळी नदीत बोटीचा स्फोट झाला. ओव्हरलोडिंगमुळे जुन्या बोटीचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी बोटीमध्ये महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने होती.

घटनेबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बलिया येथे सोमवारी फेफना पोलिसस्टेशन हद्दीत ही दुर्घटना घडली. येथे गंगा मदी माल्देपूर घाट येथून जात होती, ती नदीमध्ये उलटली. या घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलियामध्ये इंजिनमध्ये बिघाड आणि जोरदार वाऱ्यामुळे बोट असंतुलित होऊन उलटून ती महिलांचा मृत्यू झाला. बोट उलटल्याची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. चार महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोटीखाली कोणीही अडकले नसल्याची खात्री होईपर्यंत बचावकार्य सुरूच राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.