चाळीसगाव कृ उ बा समिती सभापतीपदी कपिल पाटील तर उपसभापती साहेबराव राठोड बिनविरोध

0

 

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

चाळीसगाव कृ उ बा समितीच्या अत्यंत चूरशीच्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वातील शेतकरी पॅनलने बाजी मारत 18 पैकी 15 जागा जिंकल्या होत्या त्यानंतर सभापती कोण होणार? याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून होते. अखेर आज 22 रोजी सभापती उपसभापती पदाची निवडणूक पार पडली त्यात आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात सभापतीपदी कपिल पाटील तर उपासभापतीपदी साहेबराव राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती पदी कोण बसणार आता याला पूर्णविराम मिळाला आहे. प्रथमच तरुण चेहऱ्यांना संधी मिळाली असून प्रत्येक वर्षी नवीन असे पाच सभापती व पाच उपासभापती असा फार्मुला असणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे. यावेळी निवडून आलेले संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, कर्मचारी व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.