१७ वर्षीय तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव – राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन १७ वर्षीय तंजीलाबी शेख अन्सार (रा. मणियार मोहल्ला, नशिराबाद) या मुलीने गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारासआत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील नशिराबाद येथे उघडकीस आली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नसून प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील मणियार मोहल्ल्यात तंजीलाबी शेख अन्सार ही मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होती. तिचे वडील शेख अन्सार शेख शकील हे हातमजुरीचा व्यवसाय करतात. तर आई गृहीणी आहेत. गुरुवारी दुपारी वडील हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तर आई दुपारी २ वाजेच्या सुमारास लहान बहिणीला घेऊन, गावातच राहत असलेल्या मामाकडे गेली होती. घरात कोणी नसल्याने तंजीलाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली

Leave A Reply

Your email address will not be published.