अंगणवाडी सेविकेने राहत्या घरात घेतला गळफास

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अंगणवाडी सेविकेने कंडारी येथे राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण समजू शकले नाही. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सीमा रामभाऊ तायडे (41, राजपूतवाडा, कंडारी) असे मयताचे नाव आहे.

कंडारी गावात सीमा तायडे या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरातील स्टोअर रूमच्या अँगलला ओढणीने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतरपोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह रुग्णालयात हलवला. या प्रकरणी कृष्णा लोटू तायडे (55, राजपूतवाडा, कंडारी) यांच्या खबरीनुसार भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मृत विवाहितेच्या पश्चात पती, दोन मुले, सासू असा परीवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.