0

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला वन डे सामना आज हैदराबाद (Hyderabad) येथे होत आहे. ३ वर्ष, १० महिने व १६ दिवसांनी हैदराबाद या ठिकाणी वन डे क्रिकेट होत असल्याने स्टेडियम फुल झाले आहेत. श्रीलंकेला हरवून भारतीय संघ (Indian team) आयसीसी (ICC) क्रमवारीत नंबर वन असलेल्या न्यूझीलंड (New Zealand) सोबत आपली पहिला सामना खेळणार आहे. या मालिकेत विजय मिळवून भारताला नंबर वन बनण्याची संधी आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) व शुभमन गिल (Shubman Gill) यांनी तशी दणक्यात सुरुवातही केली आहे. रोहितने हेन्री शिप्लीच्या (Henry Shipley) गोलंदाजीवर असा षटकार मारला व यावर गोलंदाजी करणारा हेन्री शिप्ली हा बघतच राहिला. या षटकारासह रोहितने वन डे क्रिकेटमधील मोठा विक्रम मोडला.

मालिकेआधीच श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पाठीच्या दुखण्यामुळे ह्या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. अशात सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) प्लेइंग इलेव्हनचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याचे सामन्यात पुनरागमन झाले, तर इशान किशन व सूर्यकुमार यादव यांना संधी मिळाली.
वन डे क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक १२४ षटकारांचा विक्रम रोहितने नावावर करताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) (१२३) याला मागे टाकले. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर सर्वाधिक २४० षटकार आहेत. त्यानंतर धोनी १८६, विराट कोहली १३६, युवराज सिंग ११३, वीरेंद्र सेहवाग १११ व सचिन तेंडुलकर १०७ असा क्रमांक येतो.

Leave A Reply

Your email address will not be published.