गगनयान मोहीमेसाठी भारताने निवडले चार अंतराळवीर, पंतप्रधानांकडून नावाची घोषणा

0

तिरुवनंतपूरम ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) गगनयानचा एक भाग म्हणून कमी-पृथ्वीच्या कक्षेत उड्डाण करणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे जाहीर केली, जी पहिली क्रूड भारतीय अंतराळ मोहीम असेल. केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट देताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली.
ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला यांना अंतराळात पाठवण्यासाठी निवडण्यात आले आहे. हे सर्वजण भारतीय वायू सैन्यातील विंग कमांडर किंवा ग्रुप कॅप्टनमधील आहेत. या सर्वांना बंगळुरु येथील एस्ट्रोनॉट ट्रेनिंग केंद्रात ट्रेनिंग देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुवनंतपुरम येथील इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला आज भेट दिली . या ठिकाणी एका कार्यक्रमात चारही अंतराळवीरांची ओळख जगाला करून दिली आहे .

गगनयान मोहीम काय आहे?
गगनयान मोहीम इस्रोची पहिली अशी मोहीम आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला अंतराळात पाठवले जाणार आहे. अंतराळवीरांना 400 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या अंतराळाच्या कक्षेत पाठवले जाणार आहे. अंतराळवीर तीन दिवस अंतराळात राहणार असून त्यानंतर जमिनीवर परतणार आहेत. अंतराळ यानाचे लँडिंग समुद्रात केले जाणार आहे. यासाठी इस्रोकडून व्यक्तीला अंतराळ पाठवण्यासाठी सक्षम असणारे रॉकेट, लाइफ सपोर्ट सिस्टिमसह अन्य खास तयारी केली जात आहे. याआधी अंतराळात व्यक्तीला पाठवण्याची मोहीम अमेरिका, रशिया आणि चीनने यशस्वीपणे पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.