यूट्यूब झालं डाऊन, व्हिडिओ अपलोड करण्यास येतेय अडचण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जगातील सर्वात मोठं व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या यूट्यूबवरतांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. आपण अपलोड केलेले व्हिडिओ यूट्यूब स्टुडिओवर दिसत नसल्याची तक्रार कित्येक युजर्सनी केली आहे. मंगळवार सकाळपासून ही अडचण दिसून येत असल्याचं युजर्सनी आपल्या तक्रारीत म्हंटल आहे. याबाबत ‘एक्स’वर कित्येक पोस्ट पाहायला मिळत आहे.

अपलोड करत असलेल्या व्हिडिओंसोबतच आधीपासून शेड्युल केलेलं व्हिडिओही पुढे पब्लिश होत नसल्याची तक्रार युजर्सनी केली आहे. एक्सवर कित्येक युजर्स यूट्यूबचं मुख्य हँडल आणि युट्युब इंडियाचं अधिकृत हॅंडल या दोन्हीला टॅग करून याबाबत विचारणार करत आहेत. विशेष म्हणजे, आज सकाळपासून यूजर्स तक्रार करत असूनही यूट्यूबने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

यूट्यूब झालं डाऊन ?
सोशल मीडियावर YouTube Glitch सोबतच YouTube Down अशा कीवर्ड्सच्या पोस्टही दिसत आहेत. केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील युजर्स अशा आशयाच्या पोस्ट असल्याचे संपूर्ण जगभरातील यूट्यूब सेवा ठप्प झाली असल्याचं म्हंटल जातंय. यूट्यूबने लवकरच याबाबतच काहीतरी अधिकृत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी यूजर्स आपल्या पोस्टमधून करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.