खुशखबर ; पीएम किसान योजनेचे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन-दोन हजार रुपये जमा होणार

0

 

नवी दिल्ली ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी, 28 फेब्रुवारीला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी करतील. सुमारे नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम तीन हफ्त्यांमध्ये दिली जाते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात.

शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन-दोन हजार रुपये जमा होणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हफ्ता उद्या म्हणजेच 28 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.